छाताडावर गोळ्या झेलून आज देखील गांधी चिरतरुण आहेत,
त्यांचं आस्तित्व मिटविण्यासाठी आजही त्यांच्या छाताडावर कित्येक काडतुस आजही रिकामी केली जातात,
तरीही एका हाताने आपला पोषाख सावरत व दुसऱ्या हातातील काठीने तोल सांभाळत गांधी फिरत राहतात भारत भर.
कधी गांधी चेहरा बनतात CAA विरोधातील आंदोलनाचा,
तर कधी उपोषणाला बसतात लोकशाहीच्या रक्षणासाठी,
कधी गांधी रोजगारहमी योजना बनतात, आणि पालकत्व घेतात बेरोजगारांचं,
कधी कधी तर ते विदेशात ही अवतरतात, आणि मानसन्मान वाढवतात भारत भूमीचा.
गांधी कोणालाही कधीच नाराज करत नाहीत,
मग त्यांचा फोटो असलेल्या नोटेची तुम्ही दारू विकत घ्या अथवा डाळ,
गांधींची एकच इच्छा त्यांना अजरामर बनवते,
ती मंजे भारतातील शेवटच्या नागरिकाचं त्यानं कल्याण करायचं आहे.
म्हणूनच असेल कदाचित, गांधी मरत नाहीत , चिरतरुण आहेत, अगदी छाताडावर वारंवार गोळ्या झेलून सुद्धा !
🖋️ शुभम छबुराव साळवे