राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच शेतकऱ्याची बाजू घेत असतात. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मानसिक तसेच आर्थिक हातभार लावण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेकऱ्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यभर शेतकऱ्यांचा आक्रोश पहायला मिळत आहे. राज्य शाषनाकडून भरिव मदतीची अपेक्षा शेतकरी करत आहेत. शाषनाकडून भरीव मदत होईल की नाही माहित नाही मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत.
आज शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर-परंडा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. शरद पवार दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार असून, यादरम्यान पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. १९ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून, शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधकांसह विविध घटकांकडून केली जात आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेल्या पिकांच्या नासाडीची पाहणी करण्यासाठी शरद पवार दौरा करत असून, दौऱ्याची सुरूवात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर-परंडा तालुक्यापासून केली आहे.