अधिकाऱ्यांना फक्त चोप देणारा नाही तर,वेळप्रसंगी मदत करणारा मंत्री…

17

महाराष्ट्राचे राज्यमंत्री बाच्चू कडू वेगवेगळ्या कारणांसाठी कायम चर्चेत असतात. नावीन्यपूर्ण आंदोलनामुळे ते ओळखले जातात. त्यांनी अनेकदा भ्रष्ट अधिकाऱ्यांना खडसावले आहे. त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना चोप दिल्याच्या बातम्याही आपण वाचल्या असतील. मात्र, अधिकाऱ्यांना मदत करणारे बच्चू कडू काल महाराष्ट्राला पाहायला मिळाले.

एका तहसीलदारांच्या उपचारासाठी मंत्री कडू यांनी नऊ लाखांची मदत मिळवून देत. आपल्या दिलदार स्वभावाचा प्रत्यय अधिकाऱ्यांना करून दिला आहे. मंत्री कडू यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून हा प्रसंग सांगितला आहे. चंदुर बाजार येथील नायब तहसीलदार यांचा अपघात झाला. त्यामुळे उपचारासाठी कुटुंबाला आर्थिक बोजा सहन करावा लागला. हे भेटीदरम्यान कळताच मंत्री कडू यांनी कर्मचारी अपघात विम्यातून नऊ लाख रुपयांची मदत केली आहे. शिक्षण खात्याचे राज्यमंत्री असलेल्या कडू यांनी काही दिवसांपूर्वीच दोन दिव्यांग मुलींच्या पालकांना घरकुल आणि इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळवून दिला होता. त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतंय.