बॉलीवुडमधील दिग्गज अभिनेता रणवीर सिंह नेहमी चर्चेत असतो. मात्र यावेळी तो चर्चेत आला आहे अपघातामुळे. गुरुवारी मुंबईत वांद्रे येथे या प्रकार घडला. एक छोटासा अपघात झाल्याची माहिती समोर आली. रणवीर सिंहच्या मर्सिडीज कारला एक बाईक स्वारने मागून येऊन धडक दिली. या अपघातात त्याला कोणत्याही प्रकारचा मार लागला नाही. परंतु गाडीचे थोडेफार नुकसान झाले आहे. यादरम्यान रणवीर स्वतः कारमधून बाहेर येऊन त्याने गाडीची अवस्था पाहिली.
रणवीर सिंह त्याचं डबिंगच काम पूर्ण करून घरी जात असताना ही घटना घडली. यावेळी रणवीर स्पोर्टी लुकमध्ये पाहायला मिळाले. ब्लॅक शॉर्टस आणि ब्लॅक टीशर्ट घातला होता. रणवीरने ब्लॅक कॅप आणि गुलाबी रंगाचे शूज घातले होते. रणवीर लवकरचं ’83’ फिल्म मध्ये दिसणार आहे. तो कपिल देवची भूमिका साकारणार आहे. त्या चित्रपटाच्या चित्रिकरण आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण झालं आहे. हा चित्रपट नाताळपर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे.