बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची आई आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते राकेश रोशन यांची पत्नी पिंकी रोशन यांना कोरोनाची लागण झाली आहे. पिंकी रोशन यांना सौम्य लक्षणे आढळून आल्याने घरीच त्यांना आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्याने वय 67 वर्ष असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.
एबीपी माझा न्यूजशी बोलताना, त्यांनी सांगितले की खबरदारी म्हणून माझे कुटुंब व घरातील संपूर्ण कर्मचारी दर दोन-तीन आठवड्यांनी कोविड 19 चाचणी करतायेत. माझीही चाचणी पॉसिटीव्ह आली आहे. म्हणून डॉक्टरांनी घरी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. आयसोलेशनमध्ये असतानाही कुटुंबीयांनी त्यांनी खूप छान सरप्राईज दिलं. कोरोना पॉझिटिव्ह असतानाही पिंकी रोशन यांचा वाढदिवस साजरा केला.