अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा ठाकरे सरकारवर टिका करताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिच्या बाबतीत वापरलेल्या हरामखोर शब्दाला ती विसरली नाही. कंगना या शब्दावरून ठाकरे सरकारवर नेहमी टिका करत आहे. हिमाचल प्रदेशातील पाहूणचाराचा संदर्भ घेत तिने संजय राऊतांवर पुन्हा निशाणा साधला आहे.
हिमाचल मध्ये ‘भूत पोलीस’ फिल्मचं शूटिंग होणार आहे ही बातमी समजताचं, “मुंबईतील जास्तीत जास्त फिल्म युनिट्स सध्या हिमाचल प्रदेशात येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. देवभूमी ही प्रत्येक भारतीयाची आहे आणि सर्व इथे पैसे कमवू शकतात असे कंगणाने ट्विट केले.
तसेच या ट्विटमध्ये तिने आमच्या देवभूमीत कुणालाही हरामखोर, नमकहराम म्हंटल जात नाही आणि कुणी तस केला तर मी निषेध करेन बॉलीवूड सारखा गप्प बसणार नाही असं ती म्हणाली. भुत पोलीस फिल्मच्या शूटिंगसंबंधित ही बातमी आहे. या फिल्मचे शूटिंग हिमाचल मध्ये होणार आहे. यासाठी सैफ अलि खान, यामी गौतम, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस मुंबई मधून हिमाचल प्रदेशला रवाना झाले. पण त्यांना इकडे हरामखोर म्हंटल जात नाही असा टोला राऊतांना लगावला आहे.
मुंबई हायकोर्टात संजय राऊतांच्या हरामखोर शब्दाची शहानिशा झाली होती. याबाबतीत स्पष्टीकरण देखील मागण्यात आलं होतं. त्यावेळी संजय राऊत यांच्या वकिलांनी माझ्या अशिलाने कोणाचं नाव घेतला नव्हतं असे सांगितले होते. याच शब्दाचा संदर्भ घेत कंगनाने जहरी टिका केली आहे.