अभिनेत्री काजल अग्रवाल अडकली लग्नबेडीत

19

दक्षिणेसोबत बोलीवुड चित्रपटांमध्येही नावाजले अभिनेत्री काजल अगरवाल हिच्या विवाहसोहळा संपन्न झाला आहे. काजल अगरवालने व्यावसायिक गौतम किचुल सोबत लग्न केले. सोशल मिडीयाच्या माध्यमातुन हा फोटो समोर आला आहे. चाहत्यांनी यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. विवाहबंधनात अडलेल्या काजल आणि गौतम यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंत्रिणींना या सोहळ्याचे आमंत्रण होते. एक महिन्यांपूर्वी काजलने इंटेरिअर डिझायनर असलेल्या गौतम किचल सोबत लग्न ठरल्याचं जाहीर केले होती. काजल आणि गौतमने लाल,गुलाबी आणि सोनेरी रंगचा लेहंगा आणि शेरवानी परिधान केली होती. काजलने काही दिवसांपूर्वीच खासगी आयुष्याबाबत बातमी शेअर करत ती विवाहबंधनात अडकणार हे जाहीर केले होते.