‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा आज लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या ती लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक फोटो व्हायरल होत आहेत. तिने मेहंदीचे आणि हळदीचे फोटो पोस्ट केले आहेत.
प्रसिद्ध उद्योजक तेजस देसाई सोबत शर्मिष्ठा लग्न करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला होता. लॉकडाउनच्या नियमांचे पालन करून शर्मिष्ठा व तेजस यांचा साखरपुडा सोहळा जेमतेम 35 जणांच्या उपस्थित पार पडला होता. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंटचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
लॉकडाउनच्या काळात अनेक सेलिब्रिटी लग्न बेडीत अडकली आहेत. शर्मिष्ठाची मैत्रीण अभिनेत्री सई लोकूरचा देखील काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला आहे. शर्मिष्ठा आणि तेजस आयुष्याच्या महत्वाच्या दिवसाबाबत उत्साही आहेत. शर्मिष्ठाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर करत ‘ तुम्ही आमचा स्वीकार केलात आणि आम्ही दोघेही याबद्दल आनंदी आहोत. आम्ही दोघेही 11.10.2020 रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहोत. आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम हवे आहे’ असे लिहले आहे.