मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अद्याप राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाही. त्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं. त्याच पत्राविषयी भाजपाचे चाणक्य अमित शहा यांनी नाराजी दर्शवली आहे. एका इंग्रजी वाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते. राज्यपालांनी अधिक चांगल्या शब्दांचा वापर करायला हवा होता असं ते म्हणाले.
सदरील पत्रात राज्यपालांना उध्दव ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि त्यांच्या सेक्युलर बनाण्याच्या अनुषंगाने टिप्पणी केली होती. शब्दांच्या तीव्रतेने मुख्यमंत्री दुखावले गेले होते. त्यांनी राज्यपालांना पत्राद्वारे प्रतिउत्तर दिले आहे. राज्यपालांची भाषा ही राजकीय नेत्यांसारखी असल्याची टीका माध्यमातून झाली होती. त्यावर आता अमित शहा यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्युलर ठरवून अवहेलना करणार का?, असा थेट सवाल पवार यांनी मोदींना विचारला होता. तसेच राज्यपालांचं हे वागणं संविधानाच्या चौकटीबाहेरचं आहे. या पत्रातील भाषा पाहून तुम्हाला माझ्या म्हणण्याची खात्री पटेल याची मला खात्री आहे.