अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार झाला जाहीर

28

गेल्या आठवड्याभरापासून नोबेल पुरस्काराची घोषणा होत आहे. 2020 च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सोमवरी घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन या दोघांना जाहीर झाला आहे.

मिलग्रोम आणि विल्सन यांनी लिलाव पद्धतीचा अभ्यास केला आहे. त्यांनी आपल्या प्रेरणेद्वारे नव्या लिलाव स्वरूपांचाही शोध लावला आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि नव्या पद्धतींचा शोधांसाठी यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. हे दोघेही अमिरेकांच्या स्टॅनफर्ड विद्यापीठात कार्यकत आहेत.

ज्या वस्तू आणि सेवा पारंपरिक पद्धतीने विकणे कठीण जाते, त्या वस्तूंचा लिलाव सोप्या पद्धतीने तयार केला आहे. असं स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सने Royal Swedish Academy of Science आपल्या प्रेस रिलिझमध्ये म्हंटल आहे. या पद्धतीमुळे जगभरातील विक्रेते, खरेदीदार यांचा मोठा फायदा झाला आहे.