अवघ्या काही मिनिटात ‘अटल’ बोगदा उधवस्त करू, चीनची दर्पोक्ती

35

सामरिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण असलेल्या अटल बोगद्याचे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच उद्घाटन केले आहे. यावेळी मोदी यांनी हात उंचावून केलेल्या अभिवादनामुळे ते सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोलदेखील झाले. मात्र भारताच्या दृष्टीने या बोगद्याचे महत्व नाकारता येणार नाही. चीनने मात्र या बोगद्याविषयी त्यांचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समधून गरळ ओकली आहे. ग्लोबल टाईम्स मध्ये लिहलेल्या लेखात म्हटले आहे की, भारताला या बोगद्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असला तरी युध्दाच्या प्रसंगी मात्र काहीही फायदा होणार नाही.

लष्करी क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ असणाऱ्या साँग झाँगपिंग यांनी लिहिलेल्या लेखामध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता असताना भारताला या बोगद्याचा भरपूर फायदा होईल असं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी युद्धाच्या काळामध्ये या बोगद्याचा भारताला फारसा उपयोग होणार नाही कारण चिनी सैन्य काही मिनिटांमध्ये हा बोगदा उद्ध्वस्त करु शकतं, अशी दर्पोक्तीही या लेखात करण्यात आली आहे. युद्धाच्या वेळी खास करुन लष्करी लढाईमध्ये या बोगद्याचा विशेष काही फायदा नाहीय असंही लेखात म्हटलं आहे. चीनच्या पीपल्स रिपब्लिक आर्मीकडे बोगदा नष्ट करण्याच्या अनेक पद्धती असल्याचा दावा लेखात केला आहे. त्यामुळेच भारत आणि चीनने एकमेकांसोबत शांततापूर्ण संबंध काम ठेवणेच दोन्ही देशांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल असा सल्लाही या लेखातून देण्यात आला आहे.