काही दिवसांपासून वडील आणि मुलाच्या गाण्याच्या रियाजाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तो नेमका कुणाचा हा प्रश्न सगळ्यांना पडला आसेलच. पारनेर तालुक्यातील रहिवासी तानाजी जाधव आणि त्यांचा मुलगा तीन वर्षीय श्री यांचा नाट्यसंगीत गातांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तानाची हे सूरतमध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या रियाजामुळे मुलगा श्रीच्या कानावर आपसूकच संगीताचे संस्कार होत आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ शेअर करत व्हिडिओ बनवणाऱ्या तानाजी जाधव आणि त्यांच्या मुलांशी संपर्क साधून व्हिडिओ मागील पार्श्वभूमी समजून घेतली. चाइल्ड इस द फादर ऑफ मेन असं कॅप्शन देत नाट्यसंगीत गाणार्या श्री चे कौतुक त्यांनी केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज संगीत रसिकांनी हा व्हिडीओ लाईक आणि शेअर केलाय.
सहज म्हणून त्यांनी श्री चा गात असतांनाचा व्हिडिओ शूट केला. आणि सोशल मीडियावर शेअर केला. आणि बघता बघता तो लाखो लोकांपर्यंत पोहोचला सुद्धा. अगदी राज ठाकरे, वेणूगोपाल, आदर्श शिंदे, चंद्रकांत पंडित अशा लोकांपासून महानायक अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल हॅण्डल वरून शेअर केला आहे.