देगलूर : जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तेलंगणा राज्यातील खंडेबल्लूर येथे दिनांक ९,१० व ११ तारखेस भव्य अश्या हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र- तेलंगणा – कर्नाटक या सीमेवर असलेल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या जुक्कल मंडळ मधील खंडेबल्लूर येथील युवकांच्या वतीने विविध सामाजिक व नाविन्यपूर्ण उपक्रम वर्षभर राबवित असतात याचाच एक भाग म्हणून या नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला ‘आंतराष्ट्रीय हॉलीबॉल सामन्याचे’ आयोजन दि ९, १० व ११ जानेवारी रोजी करण्यात येत असून या सामन्याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस एकवीसU हजार रुपये व चषक तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस बारा हजार पाचशे रुपये व चषक ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातून नांदेड जिल्ह्यातील हॉलीबॉल टिमने मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा असे आव्हान खंडेबल्लूर येथील युवकांनी केलं. खंडेबल्लूर हे गाव देगलूर – हैदराबाद रोड वरील जुक्कल रोड वर आहे. अधिक माहितीसाठी श्री श्रीनिवास कोमावार मो.+९१९०००६९९७९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
,