आज नवरात्राला सुरुवात होत आहे. महिला भाविक मोठ्या प्रमाणात देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असतात. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीत देवी तसेच स्त्रियांना पूजनीय मानलं आहे. मात्र २१ व्या शतकात अजूनही महिलांकडे भिगवस्तू म्हणून पाहिलं जातं. देशामध्ये महिलांसाठी सुरक्षित वातावरण नसल्याचं वेळोवेळी म्हटलं जातं. महिलांना अस्थिर वाटेल अशी परिस्थिती देशात असल्याचं अनेकदा राजकीय नेत्यांनी म्हटलं आहे.
आज नवरात्रीनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहे. “आजच्या युगात महिलांचा सन्मान करणं देवीच पूजन करण्याइतकं अवशकी आहे” असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच नवरात्रीच्या शुभेच्छा सुद्धा ट्विट करत दिल्या आहेत. हाथरस घटनेत त्यांनी केलेले प्रयत्न माध्यमांमधून कौतुक करून गेले होते. महिलांच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी वेळोवेळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.