आजी, माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अता व्यावसायिक अभ्यासक्रमात ५ टक्के जागा राखीव असणार  

9

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका व पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता राज्यातील आजी, माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी आता ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. या पूर्वीची जास्तीत जास्त ५ जागेची अट रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. श्री. सामंत म्हणाले, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट प्रत्येक अभ्याक्रमाकरिता ५ टक्के समांतर आरक्षण विहित करण्यात आले असून या प्रवेशाकरिता प्रत्येक संस्थेमध्ये असलेली जास्तीत जास्त ५ जागांची प्रचलित अट चालू शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येत आहे.

या निर्णयामागे आता आजी माजी सैनिकांच्या पाल्यांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. त्यामुळे सैनिकांच्या पाल्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचं सैनिकांच्या कुटुंबीयांनी स्वागत केलं आहे. मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावत असते. मात्र या निर्णयाचा फायदा आमच्या मुलांना होईल असं त्यांनी म्हटलं आहे.