आणखी एका अभिनेत्रीचा बॉलिवूडला रामराम…

15

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री झायरा वसिम हिने बॉलिवूड सोडल्याची मोठी चर्चा झाली होती. त्याला कारणही तसचं होतं. ज्या कारणाने झायरा वसिम हिने बॉलिवूड इंडस्ट्री सोडली त्याच कारणाने, तिचीच री ओढत आणखी एका अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. सना खान असं या अभिनेत्रीचं नाव असून इस्लामच्या मार्गावरून मी भटकले होते. असं म्हणत इस्लामसाठी आणि मानवतेसाठी आपण सिनेसृष्टीला रामराम ठोकत असल्याचे म्हटले आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोष्टमध्ये सना लिहते, आज मी आयूष्याच्या महत्वाच्या वळणावर येऊन पोहचले आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. या काळात मला पैसा, प्रेम, प्रतिष्ठा सर्व काही मिळाले यासाठी चाहत्यांचे आभार. पण काही दिवसांपासून मला वेगळाच प्रश्न पडला आहे. पैसै आणि प्रसिद्धी हाच या जगात येण्याचे उद्दष्ट आहे का,मेल्यानंतर आपले काय हा प्रश्न आपल्याला पडायला नको. या प्रश्नाचे उत्तरे मी शोधत आहे. त्यामुळे आज मी घोषणा करते की, आजपासून मी बॉलिवूड सोडून यापुढील जिवन मानवता आणि अल्लहच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेत आहे.

आधी झायरा वसीम आणि आता सना खान यांनी एकाच कारणाने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाची चर्चा होणे स्वभाविक आहे.