राज्यातील सर्वच प्रमुख शहरांच्या चौका-चौकात आणि सार्वजनिक ठिकाणी तुम्ही-आम्ही भिक मागणाऱ्या लहान-लहान मुलांना आणि वृद्धांना पहिले आहे कधी कधी तर त्यांची संख्या इतकी जास्त असते जी त्यांचा कंटाळा यायला लागतो. तो भिक मागणारा कोण आहे ? तो भिक का मागत असेल ? त्याला खरंच भिक मागल्याशिवाय जमणार नाही काय ? भीक मागून असे किती रुपये तो जमवत असेल ? त्या पैस्यांचा तो काय करत असेल ? ते पैसे तो स्वता ठेवून घेत असेल कि दुसर्या कोणाला देत असेल ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
मधल्या काही वर्षात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर सारख्या महानगरांमध्ये लहान मुलांचे अपहरण करून, त्यांना धाक दाखवून त्यांच्याकडून भिक मागून घ्यायचे प्रकार खूप वाढत आहेत. बालकांकडून त्यांच्यावर कोणत्याही वैयक्तिक व कौटुंबिक दबाव टाकून अशी कृत्ये करून घेण्याची गुन्हेगारी वाढत चालली आहे अशाने लहान बालकांचे शैक्षणिक आणि सामजिक नुकसान जास्त होऊ लागला आहे. आणि काही तर अत्यंत बिकट परिस्थिती असल्यामुळे भिक मागल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे भिक मागतात.
अशा भिक मागणाऱ्यांची आता सरकार काळजी घेणार आहे. ज्यांना खरच गरज आहे त्यांना मदत केले जाईल आणि जे नाईलाजाने कोणाच्या दबावाखाली भिक मागत असतील तर त्यांची त्यातून सुटका होणार व गुन्हेगारांना शिक्षा मिळणार. अशा लोकांना राज्य सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल केले जाणार आहेत. चला तर मग अशा भिक मागणाऱ्यांची माहिती राज्य शासनाला देवूयात व त्यांना मदत करूयात. भिक्षेकऱ्याचे भीक मागतानाच्या छायाचित्रासह तारीख, शहर आदी माहिती mahabhishodhpune@gmail.com या मेल पत्त्यावर पाठवूयात.