…आता पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं; शिवसेना नेत्याच जाहीर निमंत्रण

31

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. खडसेंसोबत आता नेमके कोणकोण भाजप सोडून राष्ट्रवादीत जातील याबद्दल चर्चा आहे. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना काय मिळणार असा प्रश्न विचारला असता, खडसेंचा पक्षप्रवेश हा सुखद क्षण असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसेंच्या अनुभवाचा पक्षाल फायदा होईल असंही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रण माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिले आहे. मी एक पक्षाचा सच्चा सैनिक म्हणून पंकजाताईंना विनंती करतो त्यांनी सेनेत यावं अस अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून राजकीय अज्ञातवासात असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्यांनी सध्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दौरा केला आहे. पंकजा मुंडे यांना हळुवार बाजूला केलं जात असल्याचं त्यांच्या समर्थकांच म्हणणं आहे. त्यामुळे खोतकर यांनी दिलेलं निमंत्रण पंकजा मुंडे स्वीकारणार का ? हा येणारा काळच ठरवणार आहे.