भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा बहुप्रतिक्षीत पक्षप्रवेश आज मुंबईत झाला. यावेळी बोलताना खडसे यांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच, आता कुठे मला थोडं हलकं झाल्यासारखं वाटतय असं खडसे म्हणाले.
गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने?
माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे.