आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा, निलेश राणे यांचा टोला

26

कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनसंदर्भात बोलताना आमचे सरकार असते तर १५ मिनिटात चिनला त्यांच्या घरात वापस पाठवले असते असे विधान केले होते. यावर आता सर्वच स्तरातून टीका होत आहे. भाजपा नेते व नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी चिमटा काढला आहे. चीनला धडा शिकवण्याआधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा असं आव्हान दिलं आहे.

कोरोना संकटाच्या काळात सर्वपक्षीय नेते राज्यातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या निवासस्थानाला चिकटून बसले आहेत. याच कारणामुळे त्यांच्यावर याआधीही टीका झाली आहे.

१५ मिनिटांत चीनला बाहेर फेकले असते, असे म्हणणाऱ्या राहुल गांधींचा इतिहास कच्चा असल्याचा टोला निलेश राणेंनी लगावला. राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण “आमची चर्चा सुरू आहे” , असं उत्तर एके अँटनींनी हसत दिलं, पण चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार??