आनंदाची बातमी.. कोरोनावरील संभाव्य लस वितरणाची तयारी सुरू

36

गेल्या सात महिन्यांपासुन कोरोना देशभरात धुमाकूळ घालत आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोनावर लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने जिल्हा प्रशासनाकडे माहिती मागवली आहे. प्रत्येक रुग्णापर्यंत ही लस पोहोचवली जाणार आहे. लस बाजारात येण्याआधी वितरणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. सरकारने माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले आहे.

याबाबत राज्य पातळीवर माहिती संकलित करण्याचे आदेश माता बाल संगोपन व शालेय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालयात लस देणाऱ्या व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर, पर्यवेक्षक, लस देण्याचे ठिकाण, पिन कोड या प्रकारची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झालेले आहे.

पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालकांनी 8 ऑक्टोम्बरला जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक आणि महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रातून कोरोना लस लागणाऱ्या साठ्याची माहिती मागवली आहे. त्यानुसार 16 ऑक्टोम्बरपर्यंत सार्वजनिक आरोग्य परिचारकांच्या माध्यमातुन ही सगळी माहिती जमा केली जाणार आहे.

केंद्र सरकाने याबाबत राज्याला पत्र दिले आहे. त्यामुळे तयारी सुरू करण्यात आली आहे. ही लस मेडिकल सेक्टरमध्ये उपलब्ध असेल. त्यानंतर खाजगी पातळीवर निर्णय देण्यात येणार आहे.