आनंदाची बातमी! कोरोनावरील औषध येण्याची शक्यता; तिसऱ्या टप्प्यात ट्रायल सुरू

0

जगभरात कित्येक महिन्यापासून कोरोना विषाणू हाहाकार माजवत आहे. अद्यापही कोरोनावर उपचार सापडले नाहीत. संपूर्ण जगात काळजीचे आणि भीतीचे वातावरण आहे. युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचे समजत आहे. त्यामुळे काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनावरील लसीपेक्षा प्रथम कोरोनावरील औषध येईल अशी माहिती मिळाली आहे.

सीएसआयआरचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राम विश्वकर्मा यांनी या औषधाबाबत माहिती दिली. सीएसआयआरद्वारे कोरोनावरील औषध तयार करण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. एमडब्ल्यू नावाचे या औषधाच्या ट्रायलचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यामध्ये ट्रायल करण्यास मंजुरी मिळाली आहे. डॉ. राम विश्वकर्मा यांनी सांगितले की, पहिल्या दोन टप्प्यात याचा निष्कर्ष चांगला आला असून सकारात्मक आहे. आता तिसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. देशात 300 लोकांवर लवकरचं याचे परिक्षण होईल. जर तिसऱ्या टप्प्यात ट्रायल यशस्वी झाली तर पुढील वर्षात पहिल्या महिन्यात हे औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एमडब्ल्यू म्हणजेचं शरीरातील बाहेरील विषाणूच्या विरोधात लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण करतो.