सध्या जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण देशभरात झाली असून कोरोणा बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या झालेली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना संशयित रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता अधिकाधिक रुग्णालयात उपचारांची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. केंद्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये काही ठिकाणी शासकीय रुग्णालय covid-19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर covid-19 रुग्णांना अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये तसेच covid-19 महामारी च्या संकटामध्ये सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने २१.०५.२०२० व ३१.०८.२०२० च्या अधिसूचने द्वारे खाजगी रुग्णालयांमध्ये covid-19 उपचाराचे दर ठरवून दिलेले आहे.
१) या अधिसूचनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
ज्या व्यक्तीचा कुठलाही विमा नाही किंवा सध्या अस्तित्वात असलेला विमा त्या उपचारासाठी पुरेसा नाही ते सगळे व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
२) हॉस्पिटल चे किती खाट या योजनेसाठी हॉस्पिटल ने राखीव ठेवले पाहिजे ?
खाजगी किंवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये ८०% खाट हे या योजने अंतर्गत राखीव ठेवले पाहिजे व त्यावरचे उपचार हे शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये केले पाहिजे. किती खटांसाठी परवानगी आहे व किती खाट शिल्लक आहे याचे तपशील हॉस्पिटल ला प्रमुख ठिकाणी दर्शविणे बंधनकारक आहे.
३) शासनाने ठरवून दिलेले पॅकेज किती व कसे ?
i) साधारण रूम : ४,०००/- (प्रतिदिवस)
ii) आयसीयु रूम विना व्हेंटिलेटर: ७,५०० /- (प्रतिदिवस)
iii) आयसीयु रूम व्हेंटिलेटर सह: ९,००० /- (प्रतिदिवस)
४) वरील दिलेल्या पॅकेज मध्ये कोणत्या वैदकीय सुविधा समाविष्ट आहे ?
वरील पॅकेज मध्ये:
CBC
Urine
HIV
Anti HCV ( Hepatitis C)
HbsAg (Hepatitis B)
Serum Creatinine (Kidney)
Ultrasonography
2-D Echo
X-ray
ECG
Oxygen Charges
Consultation Charges
Bed Charges
Nursing Charges
Meals
या सगळ्या सुविधा पॅकेज मध्ये समाविष्ट आहे या सुविधांसाठी अतिरिक्त शुल्क द्यायची गरज पडत नाही.
अधिसूचनेनुसार लागू असलेल्या दराचा तपशील रुग्णालयात प्रमुख ठिकाणी दर्शविला जाईल. सर्व प्रकारच्या शुल्काचा तपशील रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना सांगणे हे रुग्णालयाचे कर्तव्य आहे.
५) वरील दिलेल्या पॅकेज मध्ये कोणत्या वैदकीय सुविधा समाविष्ट नाही ?
PPE किट, covid-19 टेस्ट, आणि वरील यादी मध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी पॅकेज मध्ये नाही.
६) PPE किट साठी हॉस्पिटल किती रुपये आकारू शकते ?
३१.०८.२०२० चे अधिसूचना नुसार जर रुग्ण साधारण वॉर्ड मध्ये असेल तर जास्तीत जास्त ६०० रुपये/ प्रतीदिवस, आणि रुग्ण जर आयसीयु वार्ड मध्ये असेल तर जास्तीत जास्त १२०० रुपये/ प्रतिदिवस आकारू शकते. (वरील किंमत एका PPE किट ची नाही)
७) कारोणा चाचणी करायची असल्यास हॉस्पिटल किती शुल्क आकारू शकते ?
२२००-२८०० रुपये. (Rtpcr चाचणी साठी)
८) अधिसूचने मध्ये ठरवून दिलेल्या दरा पेक्षा जास्त शुल्क आकारणी केल्यास ?
महाराष्ट्र शासनाने प्रत्येक हॉस्पिटल मध्ये एक लेखा परीक्षक (Auditor) नियुक्त केलेला आहे. जास्तीचे शुल्क आकारले असल्यास सदर बिल लेखापरीक्षका कडून दुरुस्त करून तेवढी रक्कम वजा करून घेणे.
९) हॉस्पिटल विरुद्ध तक्रार करायची असल्यास ?
जास्तीचे शुल्क आकारण्या संदर्भात तक्रार असेल तर ती जिल्हा पातळीवर मां. जिल्हाधिकारी साहेबांकडे करावी. किंवा जर हॉस्पिटल महानगरपालिकेच्या हद्दीत असेल तर महापालिका आयुक्तांकडे तक्रार करावी. व सदर तक्रारीची प्रत ही मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी मुंबई. व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, चिंचपोकळी, मुंबई येथे रवाना करावी.
लेखक – ॲड. सूरज बाळासाहेब चकोर
हाई कोर्ट, मुंबई.
9763543434
chakorsuraj@gmail.com