लहान मैदान आणि धावांचा पाऊस पडलेल्या आयपीएलच्या दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यात दिल्लीले मारली बाजी. दिल्लीने निर्धारित २० षटकांत पृथ्वी शॉच्या कमालीच्या ६६ (४१) धावा आणि कर्णधार श्रेयश आईय्यरच्या धमाकेदार ८८ (३८) धावांच्या जोरावर २२८ धावांचा डोंगर उभा केला. कोलकत्याकडून सर्वच गोलंदाज सपाटून मार खात असताना आंद्रे रसेल ने टिचून गोलंदाजीचा मारा करत ४ षटकांत केवळ २९ धावा देत सर्वाधिक २ बळी घेतले.
विजयासाठी २२९ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याकाडून सलामीला आलेल्या सुनील नारायण ने आज पुन्हा एकदा कोलकात्याच्या चाहत्यांना निराश केलं. नारायण स्वस्तात परतल्यानंतर शुभमन गिल आणि नितेश राणा या भारताच्या नवोदित खेळाडूंनी धावसंख्या खेळत ठेवली. गिल बाद झाल्यानंतर ठराविक अंतरावर कोलकात्याचे गडी बाद होत गेले. कोलकत्याकडून नितीश रणाने सर्वाधि ५८ (३५) धावांची आणि इंग्लंड चे कर्णधार असलेले इओन मॉगर्नने ४४(१८) धावांची धमाकेदार खेळी करत कोलकात्याला विजयाच्या समीप घेवून जाण्याचा प्रयत्न केला पण शेवटी पदरी निराशाच आली. धमाकेदार खेळी करणारा दिल्लीचा कर्णधार श्रेयश आईय्यार ठरला सामनावीर.
रविवार ४ ऑक्टोबर रोजी पुन्हा दोन सामने रंगणार आहेत
मुंबई इंडियन्स विरुद्ध सन राईजर्स हायद्राबाद दुपारी ०३:३ ० वाजता (शारजाह)
किंग्स XI पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी ०७:३० वाजता (दुबई)