किंग इलेव्हण पंजाबच्या आक्रमक फलंदाजीला तितकंच आक्रमक उत्तर देऊन काल झालेल्या सामन्यात राजस्थानने ७ गडयांनी दणदणीत विजय मिळविला. पंजाबने ४ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला. त्याला राजस्थानने जोरदार प्रत्युत्तर देताना १७.३ षटकात आव्हान स्वीकारून बाजी मारली. बेन स्टोक्स याने राजस्थानच्या विजयाचा पाया रचत २६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. रॉबिन उत्थापा ३० धावा, संजू सॅमसन ४८ धावा, स्टीव्ह स्मिथ ३१ धावा, जोस बटलर २२ धावा नाबाद यांनी राजस्थानला विजय मिळवून दिला.
त्याआधी स्पोटक फलंदाज ख्रिस गेलने ९९ धावांची खेळी करत पंजाबला निर्धारित २० षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभारून दिली. कर्णधार लोकेश राहुल ४६ धावा केल्या. पंजाबला सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. सध्या आयपीएल शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे खेळातील रंगात दिवसेंदिवस अधिक पाहायला मिळते आहे.