चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या आयपीएल सामन्यात राजस्थानच्या संघाने चेन्नई सुपरकिंग्जवर दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने २१६ धावांचा डोंगर उभा केला. चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही. निर्धारित षटकांत त्यांना २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.
राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी जोरदार फटकेबाजी केली. सॅमसनने ३२ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांसह ७४ धावा केल्या, तर स्मिथनेही ६९ धावा करत कर्णधारपदाची जबाबदारी निभावली. मुंबईविरूद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने जोरदार विजय मिळवला होता. मात्र, राजस्थानविरूद्ध झालेल्या सामन्यात झालेल्या पराभवाने चेन्नई संघाचे मनोबल नक्कीच खचलेले असणार आहे.