आस्थापनाधारकांवर मोठी कारवाई! वाशिम जिल्ह्यातील ८० दुकाने केली बंद

2

वाशिम जिल्हाप्रतिनिधी – अजिंक्य जवळेकर

वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक ऊपाययोजना योजण्यात येत आहे. अशांतच जिल्ह्यातील सर्व अास्थापनाधारकांना तसेच दुकानदारांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. दि. २५ मार्चपर्यंत सगळ्या आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावेत असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. तसेच आदेशांचे ऊल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सुचनासुद्धा जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिल्या होत्या.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार २६ मार्चपासून स्थानिक प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकुण ८० दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता वेग बघता सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत सर्व आस्थापनाधारकांनी तसेच दुकानदारांनी चाचणी करुन घेण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर मुदतवाढ देऊन २५ मार्चपर्यंत चाचणी करा, अन्यथा दुकाने ऊघडण्यास मनाई असणार असे सांगण्यात आले होते. परिणामी चाचनी न करणार्‍या आस्थापनाधारकांवर स्थानिक प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये कारंजा, मानोरा, मालेगाव, रिसोड, वाशिम, मंगरुळपीर शहरांसह ग्रामीण भागाचादेखील समावेश आहे.