आस नका सोडू

22

नियतीचे हास्य विकट,
ध्येय समोर अन वाट बिकट


उरी जागृत एकच आशा,
नाही मनाशी अपराधी भाषा


तेजोनिधी जरी असे नभी तप्त,
नसती साथीला स्वकीय आप्त


भयाण अंधाराची असे काळरात्र,
पाया नाही गती, शिथिल गात्र


परी संकल्प करू, संघर्ष करू,
एकच आस मनी पक्की धरू


जे उत्तुंग स्वप्न पाहिले
ते जिद्दीने पूर्ण करू


सौरभ सदावर्ते