उदित नारायण यांनी केला आदित्य नारायणच्या ट्विटबद्दल मोठा खुलासा !

23

प्लेबॅक सिंगर, टिव्ही होस्ट आदित्य नारायण नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने लग्नाची घोषणा केली आहे. लवकरच तो श्वेता अग्रवाल सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. गेली 10 वर्ष झाली तो श्वेताला देट करतोय या वर्षाखेरीस दोघे लग्न करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याने लॉकडाउन मध्ये आपली सर्व बचत संपली असे म्हटले आहे. ‘आपण वर्षभर काम नाही करणार असे कधीच वाटले नाही’. माझ्या खात्यात फक्त 18000 रुपये शिल्लक आहेत असे त्याने सांगितले. दरनिर्वाहासाठी त्याने म्युच्युअल फंडमधून पैसे काढले आहेत. ऑक्टोम्बरमध्ये काम सुरू केले नाही तर खर्च करण्यासाठी त्याला बाईक विकावी लागेल. हे खरंच कठीण आहे असे तो म्हणाला.

आदित्य नारायणच्या या ट्विटवर उदित नारायणनेही स्पष्टीकरण दिले, ‘देवाचे कृपेने आदित्यचे काम चांगले सुरू आहे. त्याच्यावर कोणतेही आर्थिक संकट आले नाही. जरी त्याला आर्थिक संकट आले तरी मी अजून जिवंत आहे. मी जे आयुष्यात कष्ट करून कमावले आहे ते सर्व आदित्यचे आहे. ‘प्रसार माध्यमामध्ये येणाऱ्या त्या बातम्यांवर मला हसू आले’ डिसेंबरमध्ये आदित्यचे लग्न होणार असून या बातम्या वाचल्यावर सासरच्या मंडळींवर काय परिमाण होईल याचा विचार करायला नको का? ते आपली मुलगी आदित्यला देतील का? उगीचं टेंशन देणाऱ्या अफवा पसरवल्या गेल्या आहेत. असे उदित नारायण म्हणाले.

अखेर आदित्य नारायणने दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे की, मी फक्त गंमत केली होती. मला कोणत्याही प्रकारची पैशाची अडचण नाही.