उद्धव ठाकरेंच भाषण व्यासपीठावरूनचं होणार: संजय राऊत

10

राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व सण, समारंभ साधेपणाने झाले आहेत. गेली काही महिन्यांपासून सर्व सण नियमांचे पालन करून जनता साजरी करत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून मुंबईत दसरा मेळाव्याची सुरवात करण्यात आली.

यंदा खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आहेत. त्यामुळे शिवसेना दसरा मेळावा कसा साजरी करणार यावर जनतेचं लक्ष आहे. दरम्यान दसरा मेळावा हा व्यासपीठावरचं होणार असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. ठाकरे घराण्यातील शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना हा पहिला दसरा आहे. म्हणून उद्धव ठाकरेंच भाषण हे व्यासपीठावरुन व्हावं, अस राऊतांच मत आहे.

शिवतीर्थावर हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने यावर्षी दसरा मेळावा होणे तर शक्य नाही. यामुळे शिवसैनिकांच्या उत्साहाचा देखील हिरमोड झाला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून ही परंपरा सुरू आहे. यावर्षी यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही. नियम आणि अटी पाळून योग्य पद्धतीने याबाबत नियोजन होईल, अशी माहिती राऊतांनी दिली. तर मेळाव्याला शिवसैनिक ऑनलाईन पध्दतीने सामील होतील, यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.