उध्दव ठाकरे आत्तापर्यंतचे सगळ्यात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. ते आता अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून काय साधणार असा प्रश्न भाजपा नेते नारायण राणे यांनी विचारला आहे. उध्दव ठाकरे यांच्या महाराष्ट्र राज्याबाबत अभ्यास शून्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उध्दव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी सोलापूर दौरा करणार आहेत.
या पाश्र्वभूमीवर नारायण राणे रविवारी सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. कोरोनामुळे एवढ्या लोकांचा बळी जात असताना आणि राज्यात पुराचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री घरात बसून होते. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण, आता वेळ निघून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
मुख्यमंत्री कायम व्हिडिओ द्वारे कारभार करत असल्याची टीका होत आहे. म्हणून सोलापूर दौरा अचानक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आखल्याची चर्चा आहे.