ऊ.प्रदेशमधील ऊन्नाव येथे धक्कादायक प्रकार! योगी सरकारवर टीकेची झोड …..

0

ऊ.प्रदेशमधील ऊन्नावमध्ये भयावह घटना घडली आहे. एकाच तीन अल्पवयीन मुलींना अोढणीने बांधले असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब अशी की यामधील दोन मुलींचा मृत्यु झाला आहे तर एकीची मृत्युशी झुंज सुरु आहे. ऊन्नाव येथील असोहा पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या बबुरहा या गावातील ही घटना आहे. या घटनेने ऊ.प्रदेशमधील महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान विरोधकांनी योगी सरकारवर चांगलीच टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुलींसाठी योगी सरकार स्मशानराज असल्याचा ऊल्लेख करण्यात येत आहे.

असोहा पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या बबुरहा गावाजवळील एका शेतात या तीन मुली त्यांच्याच अोढणीने बांधलेल्या अवस्थेत अाढळल्या आहे. तीनहा मुलींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता दोघींचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली. एक मुलगी गंभीर अवस्थेत आहे. तिच्यावर ऊपचार सुरु आहेत. पिडीता या दलीत समाजातील आहे. सकाळी चारा गोळा करण्यासाठी गेल्या असता त्या घरी रतल्याच नाही असे कुटुंबियांनी सांगीतले आहे. पोस्टनार्टम रीपोटसाठीसुद्धा मृतदेहांना पाठवले आहे. घटनेचा वेगाने तपास सुरु आहे. अशी माहिती असोहा पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.

दरम्यान आपचे नेते संजय सींह य‍ांनी एका खाजगी वृत्तवाहीनीचा रीपोर्ट ट्वीट करत योगी सरकार महिलांसाठी स्माशानभूमी ठरते आहे. अशी टीका केली आहे. सपाचे नेते सनील यादव यांनी मुलींवर अत्याचार झाला असल्याचे म्हटले आहे. मात्र पोलिसांनी यांस अद्याप अधिकृतता दिलेली नाही. भीम अर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाड यांनीसुद्धा याप्रकरणी ट्वीट करत योगी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. संबंद्धित जीवीत पिडिता हीच या घटनेचा पुरावा आहे. त्यामुळे तीला ऊपचाराकरीता तत्काळ दिल्लीत दाखल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. हाथरसच्या घटनेचा ऊल्लेख करत त्यांनी सरकारवर ताशेरे अोढले आहे.

दोन वर्षांअगोदर ऊन्नाव याठिकाणीच बलात्कारचे एक गंभीर प्रकरण समोर आले होते. ज्यामध्ये भाजपचा आमदार कुलदिप सेंगर हाच दोषी आढळला होता. ऊन्नाव प्रकरण संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर हाथरसच्या घटनेनेसुद्धा संपूर्न भारताचे लक्ष ऊ.प्रदेशातील महिला सुरक्षेकडे वेधले होते. आणि आता पुन्हा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर ऊ.प्रदेशधील कायदा व सुव्यवस्थेवर शंका ऊपस्थित होण्यास जागा आहे.