एक्साईटमेंटच्या गमती

49

प्रियकराने प्रेयसीला प्रपोज करावं हा निमित्त मात्र खेळ असतो. तसंही प्रेयसीच्या मनाने पहेल केलेली असतेच. मुलगी एकदम हो नाही म्हणत, जरी तिला तो खूप आवडतं असला. मला सांगायचं इतकंच एखादी गोष्ट मनात पक्की असते. फक्त एक्साईटमेंट दाखवली जात नाही. सुरुवातीला कळलं की हा इतका desperate आहे. तर त्यातला रस अथवा महत्व कमी व्हायची भीती असेल कदाचित…..

एक फिल्मस्टार ची मुलखात बघत होतो. तेंव्हा त्याने एक प्रसंग सांगितला होता. एका कार्यक्रम आयोजकांचा फोन आला. या, या तारखेला असा, असा कार्यक्रम आहे. आपण याल का ? आपलं काय मानधन असेल ते आम्ही देऊ. वैगेरे वैगेरे.. खरं तर मी सेलिब्रिटी असलो तरी रोज काय सुपाऱ्या नसतात. पण तरीही फोनवर असलेल्या आयोजकाला विचारायचं आपल्या कार्यक्रमाची डेट काय म्हणालात. तो सांगेल २ जानेवारी वैगेरे. आपण म्हणायचं बहुतेक मी त्यादिवशी दुसरा कार्यक्रम घेतला आहे. तरीही मला डेट आठवत नाही. मी एकदा कन्फर्म करून सांगतो. आयोजक सर बघा जमत असेल तर याच वैगेरे मिन्नतवाऱ्या करत असतोच. मनातून तर त्या कार्यक्रमाला जायचं असतं. मनात दोघांच्या असतंच. आयोजकाला आपण प्रॉमिस केलं म्हणून सेलिब्रिटी आणायचा असतो. तर सेलिब्रिटी ला सुपाऱ्या हव्याच असतात. पण सेलिब्रिटी आहे. थोडा भाव खाल्ला. तर भाव वधारातो. असे व्यावसायिक गणितं पण एक्साईटमेंट वर आधारलेली असतात…..

मित्राच्या स्पोर्ट्स बाईकवर शहर भर फिरणं हे मनमुराद आनंद देणारं असतं. ते मनात असतंच. तशी इच्छा सुध्दा असते. पण मित्र चल सोबत असं म्हणेन याची वाट पाहिली जाते. किंवा तो चल म्हणत नाही तोपर्यंत आपण का त्याच्या मागे जायचं ? हाही मुद्दा असतो. इच्छा असून एक्साईटमेंट दाखवली जात नाही. मित्र चल म्हणतोच हा मुद्दा वेगळा….

तसचं पाहुणे आले की अलगद खिशातून काढून हातात नाणं टेकवातात. लटकेच नको, नको म्हणत असायचो आपण. पण पाहुण्यांनी मोठ्ठा कॉईन द्यावा अशी मनोमन इच्छा असायची. पण बोललं जायचं नाही. एक्साईटमेंट दाखवली जात नसायची. नाहीतर पाहुणे मुलगा संस्कारी नाही. वैगेरे लेबल चीटकाऊन जायची भीती असायची. पाहुण्यांना तर कॉइन द्यावाच लागायचा हा त्यांच्या रिवाजाचा/संबंधांचा भाग झाला…..

५ वाजेपर्यंत अभ्यास करा मग तुम्ही टीव्ही पाहू शकता. असं वडिलांनी फर्मान सोडलं. तर टिव्ही आधीपासूनच पहायचा असतो. पण वडिलांनी असं म्हणाल्यानंतर लगेच उड्या मारल्या तर कदाचित निर्णय बदलण्याची भीती असते. या भीतीमुळे टिव्ही पाहण्याचं एक्साईटमेंट ५ वाजेपर्यंत टिकून राहतं. वडिलांना तर मुलाला टिव्ही पाहण्याची संधी देणं भागच असतं. नाहीतर बाप हिटलर आहे. अशी ओळख होण्याची भीती असते. मुद्दा एकच वेळ घेतला जातो…

असं अनेक वेळा, अनेक ठिकाणी घडतं. गरज, इच्छा, आनंद, प्रेम, व्यवहार, भीती इत्यादी दोघांनाही मिळणार असतंच सुरुवात करणाऱ्याला आणि शेवट होणाऱ्या व्यक्तीला सुद्धा. किंवा सहभागी व्यक्तिलाही. फक्त त्यातील एक्साईटमेंट हरवू नये. यासाठी एका टोकाकडून wait and watch केलं जातं. ते कोणत्याही कारणांसाठी असेल. मुद्दा हाच की असं जर झालं नाही. तर त्यातील आनंद संपेल…

एकदम खुशीत येस म्हणत आपण उतावीळ आहोत. हे का दाखऊन द्या. वेगळं ट्रीट झालं तर….
मुद्दा इतकाच काही विशिष्ट जागी भाव खाणं, वेळ घेणं हिताचं असतंच. आणि तो वेळ घेतलाच पाहिजे. नाहीतर आयुष्यात इंटरेस्ट येईल काय ?

रोहित गिरी