एसटी कर्मचार्‍यांना मिळणार कोरोना लस?

5

कोरोनाने एसटी महामंडळातसुद्धा शिरकाव केला आहे. एसटी महमंडळाती कर्मचारीसुद्धा पॉझीटीव्ह येत आहेत. या पार्श्वभूमिवरच एसटी कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनांनी केली आहे. मात्र कोल्हापुरचे पालकमंत्री सेतज पाटील यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. सर्व एसटी कर्मचार्‍यांना लस देऊ यासाठी आम्ही प्रयत्नशील असू असे आश्वासन सतेज पाटिल यांनी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

एसटितील चालक आणि वाहक यांचा रोज नवनविन व्यक्तींशी संपर्क येतो. तसेच एसटीमध्ये बर्‍याचदा प्रवाशांची गर्दीसुद्धा असते. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांना कोरोना होण्याची शक्यता अधिक असते. एसटी कर्मचारीसुद्धा फ्रंटलाईन वर्कर असल्यासारखेच आहे. शिवाय आता कर्माचार्‍यांनासुद्धा कोरोना होतो आहे. अशावेळी सर्व एसटी कर्मचार्‍यांना लस देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेने निवेदन देत सतेज पाटील यांचेकडे केली आहे.

सतेज पाटील यांनी याबाबत सकारात्मकता दाखवत सर्व एसटी कर्मचार्‍यांना लसीकरणासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि शासकीय आरोग्य विभाग यांचेशी दुरध्वनीवर संवाद साधून कार्यवाही करण्यात यावी असे सुचविले.

मागिल वर्षी एसटी कर्मचार्‍यांना केेलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याची उचित दखल घेणेदेखील जरुरी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली जाईल. तसेच लवकरांत लवकर यावर काम करण्यात यावे अशी मागणी स्वत: करणारस असेसुद्धा सतेज पाटील यांनी यावेळी सांगीतले.