एस टी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दीवाळीपूर्वी देणार; गरज पडल्यास कर्ज काढू : परिवहनमंत्री

19

एस टी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दीवाळीपूर्वी देणार हीच सध्या प्राथमिकता असल्याचं परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. त्यासाठी गरज पडल्यास महामंडळ कर्ज काढेल पण कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिलं जाईल असा विश्वास त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांना दिला आहे. कोरोनामुळे एस टी नुकसानीत आहे. कर्मचाऱ्यांचे पगारही करणे अशक्य झाले आहे. महामंडळाने राज्य शासनाकडे ३६०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. परंतु शासनही कोरोनामुळे अडचणीत आहे. त्यामुळे अन्य पर्यायांची चाचपणी महामंडळ करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी महिन्याला २९२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. साध्य उत्पन्न घासरल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्य होत नाही. त्यामुळे बाहेरून पैसे उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती परब यांनी दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी निश्चिंत राहावे त्यांचे थकीत वेतन कुठल्याही परिस्थितीत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.