ऑनलाईन गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! नोव्हेंम्बरमध्ये येतोय FAU-G गेम

8

भारतात खूप प्रमाणात गाजलेला चिनी मोबाईल गेम PUBG खूप दिवसांपासून बॅन करण्यात आला आहे. आता भारतीय कंपनीने बनवलेल्या FAU-G गेमची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार नोव्हेंम्बरमध्ये हा गेम भारतीयांच्या भेटीस येतोय.

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने या गेमचा टिझर लाँच केलाय. या टिझरच्या पहिल्याच सीनमध्ये गलवान खोऱ्यात उड्डाण करणारे हेलिकॅप्टर दिसत आहेत. हा गेम नोव्हेंम्बरमध्ये लाँच करण्यात येणार आहे हि ऑनलाईन गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पबजी या विदेशी गेमला पर्याय म्हणून सरकारने ‘फौजी’ हा मेड इन इंडिया गेम आणला आहे.

FAU-G याचा अर्थ फियरलोज अँड युनायटेड- गाईड असा आहे. FAU-G मध्ये प्लेअर्स भारतीय सैन्याच्या रुपात दिसेल. बंगळुरूमध्ये असणाऱ्या Ncore Games या कंपनीने गेल्या महिन्यात या गेम्सची घोषणा केली होती. FAU-G हा गेम ‘भारत के वीर’ या ट्रस्टला पाठिंबा देणार आहे. त्यातून मिळालेला 20 टक्के नफा भारतीय आर्मीला देणार आहेत. हा गेम काही प्रमाणात पब्जीसारखाचं आहे.

टिझर शेअर करताना अक्षय कुमारने लिहलं आहे की, “असत्यावर सत्याचा विजय असा आजचा दिवस आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक असलेल्या फौजींसाठी जल्लोष साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता दिवस असू शकतो? म्हणून दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर फौजीचा टिझर लाँच केला आहे.