औरंगाबाद : दिलासादायक ! जिल्ह्यात कोरोनाची मोठी घट

15

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची मोठी घट पाहायला मिळाली. काल कोरोना रुग्ण संख्या दुहेरी आकड्यात पाहायला मिळाली. दिवसभरात ८४ नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर उपचार करून सुट्टी मिळालेल्या रुग्णांची संख्या १०४ इतकी आहे. काल जिल्ह्यात ३ कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यामध्ये १७ ऑगस्ट रोजी ६४ रुग्ण होते. त्यानंतर मात्र प्रत्येक दिवशी तिहेरी संख्येत कोरोनाचे रुग्ण सापडले होते. सध्या जिल्ह्यात एकूण १०३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एकूण कोरोना रुग्नसंख्या ३७,५६५ इतकी झाली आहे. एकूण रुग्णांपैकी ३५,४७४ रुग्ण बरे झाले आहेत. आणि १,०५९ रुग्णांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे.