औरंगाबाद येथील प्रसिद्ध कर्णपुरा यात्रा नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरते. लाखो भाविक येथे भक्तिभावाने येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यात्रा भरणार की नाही असा प्रश्न सगळ्याच भाविकांना पडला होता. यावर्षी कोरोना संक्रमणाच्या संभाव्य धोका टाळण्यासाठी कर्णपुरा यात्रा महोत्सव रद्द केला असल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने कोरोना संसर्ग वाढीला कारणीभूत ठरतील. असे कोणतेही उपक्रम गरबा, दांडिया, इत्या नवरात्र उत्सवात होणार नाही. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळतंय.
कर्णपुऱ्यातील तुळजाभवानी मंदिर हे औरंगाबाद जिल्ह्याचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी नवरात्र महोत्सवात यात्रेनिमीत्त लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. त्यातून मोठी आर्थिक उलाढालही होत असते. पण, यावर्षी कोरोना संक्रमण टाळण्यासाठी खबरदारी म्हणून यात्रा होणार नाही. पुजा व इतर सर्व विधी घटस्थापनेपासून शेवटपर्यन्त योग्य ती खबरदारी घेऊन होतील. असेही नमूद करण्यात आले आहे.