सुशांतसिंह राजपूत प्रकरणात एम्सचा अहवाल आल्यानंतर कंगना राणावतने पुन्हा एकदा आगपाखड केली आहे. याआधी सुशांतसिंग मृत्यूप्रकरणी कंगनाने केलेल्या अनेक वादग्रस्त विधानांमुंळे ती चर्चेत आली होती. एखाद्याला आत्महत्या करायला भाग पाडणे म्हणजे त्याची हत्या करण्यासारखेच असल्याचे म्हणत सुशांतला हे पाऊल उचलायला कुणी लावले? असा सवालदेखील तिनं विचारला आहे.
सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्याच केल्याचं या अहवालात ‘एम्स’ने स्पष्ट केलं आहे. परंतु, कंगनाने या अहवालावर ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट सृष्टीतून सुशांतला हद्दपार करण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांपासून ते त्याच्या कुटुंबाला वाटणाऱ्या काळजीपर्यंत अनेक मुद्द्यांचा उल्लेख कंगनाने केला आहे.