कधीच नाही…

90

का कसे मज कळले, वळले कधीच नाही..
जखम हृदयाची, घाव भरले कधीच नाही..

भेटला कुठे एकांत,भास तीचाच सभोवती..
आठवणींचा काळ तो, संपला कधीच नाही..

किनारी भेट देऊन जायच्या या सागरी लाटा..
मिलाप त्यांचा माझ्याशी जाहला कधीच नाही..

कैक केले होते प्रयत्न वेधण्यास लक्ष तिचे..
तरी प्रस्ताव समोरात, मांडला कधीच नाही..

वादळी दुरावे येऊन कित्येक गेले जरी असेच..
झरा प्रीतीचा हा माझ्या,आटला कधीच नाही..

डोळ्यातून व्यक्त होतो ,असाच मी अनेकदा..
संवाद नजरेचा तुला खास वाटला कधीच नाही..

प्रियंका भस्मे, वर्धा