कर्जात बुडलेल्या भारताचे उद्योजक अनिल अंबानी यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचे दिसत आहे. एकेकाळी देशातील सर्वोच्च उद्योगपती असणाऱ्या अनिल अंबानी यांनी लंडनच्या एका कोर्टाला सांगितले की, आपण आता सामान्य जीवन जगत आहे. मला आपल्या वकिलांची फी भरण्यासाठी दागिने विकावे लागतात आणि मी फक्त एक कार वापरतो आहे अस त्यांनी यावेळी सांगितलं. दागदागिने विकून कायदेशीर खर्च गोळा करीत आहे आणि इतर खर्चासाठी अन्य मालमत्ता विकायला कोर्टाची परवानगी आवश्यक असेल.
9.9 कोटी रुपयांचे विकले दागिने
अंबानी म्हणाले की, जानेवारी ते जून 2020 दरम्यान त्याने 9.9 कोटी रुपयांचे दागिने विकले आणि आता माझ्याकडे पैसे नाहीत.
12 जूनपर्यंत चिनी बँकांना कर्ज परत करावे लागले
ब्रिटिश हायकोर्टाने 22 मे 2020 रोजी दिलेल्या आदेशात अंबानी यांना 12 जूनपर्यंत चिनी बँकांचे 71,69,17,681 (5,281) कोटी रुपयांचे कर्ज परत करण्यास सांगितले. त्याच वेळी, अंबानी यांना 50,000 म्हणजे कायदेशीर खर्चासाठी सुमारे सात कोटी रुपये देण्यास सांगितले गेले.