कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, बजाज ऑटोचा २५ हजारांचा बोनस जाहीर

38

बजाज ऑटो यांच्या वतीने तब्बल ५ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार ७६८ रुपयांचा बोनस सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. या बोनसच्या माध्यमातून कामगारांच्या हातात एकूण १३ कोटी रुपये पडणार आहेत. त्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कोरोना मुळे तीन महिने कंपन्या बंद होत्या, त्यामुळे यंदा बोनस मिळेल का ? असा प्रश्न कामगार वर्गाला पडला होता. पण, कारखानदारांनी कामगारांना बोनस देण्याचा निर्णय घेतला असल्याचं कळतंय. कामगारांना बोनस देण्यासाठी कामगार संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या कंपनी मालकांसोबत चर्चा झाल्या होत्या. याबरोबरच शासनाने कंपन्यांना २० टक्के बोनस देण्याचे आदेश काढले आहेत.

बजाज ऑटो दिवाळीसाठी प्रत्येकी २५ हजार ७६८ रुपयांचा बोनस कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करेल, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. बोनस मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावर आहे.