कविता: कृष्ण

76

वसंत होऊनी बहरावे जसे
चांदण्यात या रमावे तसे
तुझ्यात हरवून जावे तसे
बासरीचे सुर व्हावे तसे

निर्मळ ह्या पाण्यापरी
स्वच्छंदी गाण्या परी
जीवनात पावलोपावली
तुझी हवी मज साथ खरी

गाण्यातील सुंदर राग जसा
फुलांतील मकरंद तसा
मोरपिसातील रंग जसा
तुझा हवा सहवास तसा

शांत सुंदर निर्मळ
माझ्या मनीचे आभाळ
घेऊनी बासरी सुंदर
तिथे उभा तू घननिळ

आता न मज काही आशा
यावे तुझ्या गावा जगदीशा
पाव मज लवकरी
सावळ्या नको देऊ निराशा

आहे मज तुझा ध्यास
पहावे तुझे चरण खास
राधिका मी झाले आज
उरली न मनी कोणती आस

स्नेहांकित #३, कोल्हापूर