पुजा भनगे, नांदेड
गर्दीतला शहर आता
खेड्यामध्ये बदलतोय
दुरावलेली नाती
पुन्हा नव्याने जुळतेय….
बोअर कॉन्क्रेट च्या आवाजाने
पृथ्वी चक्क हादरली होती
कोरोनाच्या या काळामध्ये
ती पण आता सावरली……
वाहनाच्या या गर्दीमध्ये
दुरावलेली ती बैलगाडी
लॉकडाऊन च्या नियमामुळे
ती हि पुन्हा अनुभवली
इंटरनेटच्या जाळ्यामध्ये
पाखर सारी हरवली
वातावरणातली शांतता पाहून
चिमणी हळूच चिवचिवली…
हसत-खेळत गेलेले बालपण
आता कुठे आठवतोय?
आनंदाचे हे क्षण
पुन्हा नव्याने साठवतोय