लॉकडाऊन मध्ये मागच्या परसबागेत
छान चार-पाच झाडं लावता आली.
म्हणून, त्यांना रोज पाणी घालता आलं.
पाण्यासह जमिनीत अलगद मुरता आलं.
रोपांसह मातीत खोल,खोल रुजता आलं.
मुळांसारखं जमिनीत घट्ट स्वतःला रोवता आलं.
पानांसोबत मंद झुळकेसोबत वाहता आलं
देठांसोबत आकाशाकडे झेपावता आलं.
फांदयांसारखं विस्तृत पसरता आलं.
फुलांसोबत आसमंतात दरवळता आलं.
फळांसारखं माधुर्य जपता आलं.
झाडांसारखं हिरवं हिरवं होता आलं.
इंचा इंचानं माणूस म्हणून वाढता आलं.
झाडं होणं म्हणजे माणूस होणं नाही का ?
मला झाडं व्हायचंय ! तुम्हाला ?
– रोहित गिरी