पाऊस आला अवकाळी
शेतमालाची झाली माती
मुग-उडदाचे झाले खत
सोयाबीन गेले समुद्रात
कापसाच्या झाल्या वाती
राजकिय नेत्यांचे नुसतेच दौरे
हे आले ते आले सर्व बांधावर पाहून गेले
जे पिक होत ते पाण्यात गेलं
फक्त आणि फक्त एकच उरली
ती एक मदतीची आशा
माझा माय बाप शेतकरी, मी शेतकरी
- सोपान काळे, युवा शेतकरी दहिफळ जालना