कधीतरी एक क्षण यावं
तुझ्या डोळ्यात ग सखे
विश्व माझं तरंगत जावं
तू हसावं, मी हसतच रहावं
तुझ्यासाठीच मी जगावं
एकदा माझ्यासाठी तू जगावं
हाक तुझी येताक्षणी कानी
हृदयात नवं घरटं उभं व्हावं…
एकदाच सजणी मला
तू आपलंस करावं….
हातामध्ये हात तुझा घेऊनी
मनातल्या मनात मी झुरत जावं
काहीही जरी करत असलो
मी तुझ्यासाठीच सतत करावं
शेवटच्या श्वासापर्यंत सजणी
नाव तुझं माझ्या ओठांवरती रहावं
माझ्या अंतरी मनाला
एकदातरी तू समजून पाहावं
मनातलं ओठांवर येताक्षणी
तुझ्या मिठीत मला सामावून घ्यावं
– प्रशांत पवार