प्रसिद्ध ऊद्योगपती तसेच रीलांयंसचे मालक मुकेश अंबानी हे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन दिवसांअगोदर मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील अॅंटेलीना या निवास्थानाजवळ जिलेटीनच्या कांड्या(स्फोटक पदार्थ) ठेवलेली एक कार बेवारस अवस्थेत आढळून आली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी तपासास सुरुवात केली. जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली गाडी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ठेवण्यामागे एक दहशतवादी संघटना असल्याचे ऊघड झाले. जैश ऊल हिंद असे या संघटनेचे नाव असून या संघटनेनेच पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. या पत्रकामध्ये या संघटनेने अंबानी यांचेकडे खंडणीची मागणी केल्याचे स्पष्ट होते आहे.
जैश उल हिंद या संघटनेने ही जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली कार आम्हीच अंबानीच्या घराजवळ पाठवली होती असे म्हटले आहे. तसेच कार त्याठिकाणी ठेवणारे आमचे माणसं सुखरुप परतले आहे असेसुद्धा ते म्हणाले. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे यासंबंद्धीचा तपास सुपुर्द करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून संघटनेबाबतची अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
मुकेश अंबानी यांना या संघटनेद्वारे पैश्यांची मागणी करण्यात आली आहे. पैसे न पाठवल्यास मुलाच्या कारवर हल्ला करेन असा निर्वाणीचा ईशारासुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला पैसे पाठवा आणि आपल्या परिवारासोबत आनंदी राहा असे या पत्रात लिहीले आहे.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पीयो गाडी बेवारस अवस्थेत आढळून आल्यानंयर एकच खळबळ ऊडाली होती. यानंतर अंबानी यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबई पोलिसांनी तपासात वेग घेत जिलेटीनच्या काड्या ऊत्पादित केलेल्या कंपनीचा आणि गाडी मालकाचा पत्ता लावला होता. मात्र त्यांनतर संबंद्धित दहशतवादी संघटनेने यामागे आमचाच हात असल्याचे जाहीरपणे सांगीतले आहे. मात्र या घटनेमुळे सुरक्षायंत्रणेविषयी आता अगळपगळ चर्चा होते आहे.