किरीट सोमय्यांच्या पुत्रावर खंडणीचा आरोप

7

भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुत्रावर खंडणीचा आरोप करण्यात आला आहे.
संबंद्धित प्रकरण जुने असून एका बिल्डरकडून पैसे उकळल्याचा हा आरोप आहे. सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर याप्रकरणी नव्याने चौकशी सुरु करण्यात आली. मुलुंड पोलिस ठाण्यात त्यांचा जवाब नोंदवून घेण्यात आल्याचे कळते.
. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यातबयेत आहे. नील सोमय्या हे नगरसेवक आहेत.

  नील सोमय्या हे भाजपचे नगरसेवक आहेत. एका खंडणीच्या प्रकरणात त्यांचे नाव समोर आले आहे. बील्डरकडून खंडणी घेतल्याचा अारोप त्यांच्यावर आहे. प्रथमदर्शनी मुलुंड पोलिस ठाण्यात त्यांचा जवाब नोंदवून घेतला आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिस पुढे काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.  

 नील यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपाबाबत  नील व त्यांचे वडील किरीट सोमय्या यांनीअद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेनेला लक्ष्य करत असतात. किरीट सोमय्या यांच्यकडून  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांवर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. गेल्या काही दिवसांपासून मुरुडमधील भूखंडावरून सोमय्या हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही मालमत्ता दाखवली नाही अशी तक्रार भारताचे निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवरच नील सोमय्या यांची खंडणीच्या आरोपांवरुन सुरु झालेल्या या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात चे्चा रंगत आहे.