नव्वद च्या दशकात गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या कुली नं १ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आत्ता पुन्हा एकदा त्याचा रिमेक घेऊन बॉलिवूड अभिनेता वरून धवन आणि सारा अली खान प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आत्ता प्रेक्षकांना कुली नं१ च्या भूमिकेत गोविंदा आवडतो की वरून धवन हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
डेविड धवन दिग्दर्शित हा कुली नं १ चा रिमेक चित्रपट आत्ता येत्या 25 डिसेंबरला अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शितकेला जात आहे.या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी पहिला आहे .वरूनने चित्रपटाचे एक पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते .3 मिनिट आणि 15 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये वरून धवन आणि साराची केमिस्ट्री पाहायला मिळते.
1995 साली प्रदर्शित झालेल्या कुली नं १ सिनेमाची गाणी या रेमेकच्या रूपाने पुन्हा एकदा तुम्हाला वेड लावतील अस म्हणायला हरकत नाही .कुली नं १ च्या रिमेक मध्ये वरून धवन, सारा अली खान ,परेश राव, जावेद जाफरी ,जॉनी लिवर, राजपाल यादवसह अनेक कलाकार दिसणार आहेत .आत्ता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांना तो आवडणार का नाही हे पाहणं उत्सुकतेच ठरलं आहे .